करमरकर कुलवृत्तात प्रासिध्द करण्याची कल्पना अनेक लोकांच्या मनात पुवी येऊन गेली परंतु त्याला मुर्त नव्हते अशा प्रकारची कामे त्वरेने होत नसतात तर त्यासाठी बरीचशी माहीती एकत्रित करावी लागते व त्या माहीतीची छाननी करावी लागते वंशावळही मिळव्यावा लागतात व काही वेळा उपलब्ध माहीतीच्या आधारे बनवाव्या लागतात अनेक वेळा आलेली माहीती अपूरी त्रोटक व काही वेळा चुकीचाही असु शकते पुर्वी ज्याप्रमाणे अशी म्हण होती की घर पहावे बांधून लग्न पहावे जुळवुन आणि त्याच्याच जोडीला तर ती गैर ठरणार नाही आपल्या पुर्वजाबद्दल मातापितराबद्दल व वाडवडीलाबद्दल व त्याही पुढे जाऊन त्याच्या कतृत्वाबद्दल मनुष्यप्राणाला आभिमान वाटतो व ही नैसार्गिक प्रवृत्ती आहे आजपर्यंत ७०हुन आधिक चित्तपावन ब्राम्हणाचे कुलवृत्तांत प्रासिध्द झाले परंतु आपला कुलवृत्तात काही आजतागायत प्रासिध्द होऊ शकला नाही ह्याचे शल्य प्रत्येक करमरकर कुलबंधूच्या मनाला सलत होते व ह्यातुनच करमरकर फ़ाऊडेशन ह्या संस्थेचा जन्म ३१.३.८४ रोजी झाला त्यानंतर संस्थेने साधारणात प्रत्त्येक दोन वर्षाच्या अंतराने स्नेह्संमेलन भरविली तसेच आपले कुलदैवत व कुलदैवत्ता ह्याचा दर्शनासाठी सहलीचे आयोजन केले ह्या आयोजनाप्रमाणे श्री दत्तात्रय नागेश करमरक र्विजयनगर सोसायटी अंधेरी ह्याचा सिंहाचा वाटा उचलला कुलवृतात लिहीण्याचे काम पेन्शर निवृत्त लोक करतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे परंतु आपल्या बाबतीत एकदम उलेटच घडले आपले कार्यकारी मंडळ ज्यातील बहूतांश सदस्य स्व:तच्या व्यवसायात वा नो करीत व्यग्र असुन ही त्यांनी आपला अमूल्य वेळ कामासाठी वेचला व म्हणुनच अशाप्रकारची सर्व माहीती संकलन करुन ती छापण्याची व्यवस्था ही गेल्या सहा महिन्यांच्या अथक प्रयत्न्नातुन उभी राहिली आहे. अशा त-हेचे कुलवृत्तांत लिहायची प्रथा प्रथमत: महाराष्ट्रात इस १९१४ ह्या वर्षी सुरू झाली असावी असे दिसते कारण १९१४ ह्या वर्षी प्रथमत आपटे ह्या घराण्याचा इतिहास प्रासिध्द झाला त्यानंतर गेल्या ८५ वर्षात साधारणात ७०हुन आधिक चित्तपावन कुलांचे कुलवृत्तांत प्रकाशित झाले ज्यामध्ये सुधारित आवृत्त्याही आल्या आता पुर्वानुभवाचा फ़ायदा घेऊन नवीन कुलवृत्तांत आधिक वाचनीय होऊ लागले
२) कुलवृत्तांत प्रासिध्दीमधुन अनेक फ़ायदे मिळु शकतात.
अ) आपल्या पूढील पिढीतील लोकांच्या मागच्या पिढीचा इतिहास व आपल्या कुलबांधवांबद्दल माहिती मिळते.
अ) आपल्या पूढील पिढीतील लोकांच्या मागच्या पिढीचा इतिहास व आपल्या कुलबांधवांबद्दल माहिती मिळते.
ब) आपल्या पुर्वजांनी केलेल्या गौरव पूर्ण कामाचा वारसा मिळतो तर त्यांनी केलेल्या चुकामधून पुढे आपण बरोबर कसे वागावे ह्याबाबत आपणला धडे मिळतात
क) आपल्या कुलातील श्रेष्ट व लोकोत्तर व्याक्त्तीची माहिती पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवण्याचे कुलवृत्तांत हे एक उत्तम साधन आहे.
ड) कुलवृत्तांच्या आधारे अनेक कुलबांधव एकमेकांच्या जवळ येतात व त्यांना एकमेकाविषयी सहानुभुती व प्रेम निर्माण होते व त्याचा फ़ायदा अनेक प्रकारे होऊ शकतो उदाहरणार्थ आपल्यापैकी जे उच्च पदस्थ आहेत ते आपल्या कुलबांधवांना नोकरी मिळवुन देण्याचा संदर्भात मदत करु शकतात.तसेच डॉक्टर वकील सी ए आर्किटेक इ. त्याच्या सेवा वाजवी किंमतीत उपलब्ध करुन देऊ शकतात तसेच एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ !ह्याची प्रचिती घेता येते.
इ) कुलवृत्तांत ग्रंथाचा उपयोग संशोधकांना व शास्त्रज्ञानाही खुप होऊ शकतो कारण ह्या माहितीच्या आधारावर ते अनेक निष्कर्ष काढु शकतात ज्याचा फ़ायदा पुढील पिढीला घेता येईल
ई) "Who`s who in india who`s who in the World who`s who in Werstern india " व ह्या सारखे अनेक पारिचय ग्रंथ प्रासिध्द झाले आहेत व होत असतात त्याचप्रमाणे "Who`s who in the KARMARKAR CLAN?"असे आपणाला म्हणता येईल योजकस्तम दुर्लभ! जगात कोणत्याही वस्तु निरुपयोगी नसते" योजकाचीच वाण असते हा सिध्दांत लक्षात घेतल्यास मिळतील आपले कुलधर्म कुलाचार ह्यांची माहीती आपल्या महत्वाकांक्षी कुलाभिमान व आदर्शवाद ह्याकडे घेऊन जाण्यास होणारी मदत असे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फ़ायदे कुलवृत्तांत प्रासिध्दिमधुन आपल्या कुलबांधवांना मिळतात. |